देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्ताने रयत शिक्षण संस्थेचे, कला व वाणिज्य महाविद्यालय माढा येथील प्रो.डॉ. दत्तात्रय काळेल यांनी लिहिलेल्या शरद पवार आणि पुलोद चा प्रयोग या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

या कार्यक्रमांमध्ये शरदचंद्रजी पवार साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, आमदार जयंत पाटील, आमदार अनिल देशमुख, खासदार निलेश लंके, महिला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष माननीय रोहिणी खडसे, महाराष्ट्र राज्य उद्योग व व्यापार उद्योग समूहाचे अध्यक्ष मा. नागेश फाटे व सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा. वसंत नाना देशमुख उपस्थित होते.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



