सांगोल्यात रंगणार जिल्हास्तरीय अजिंक्यपद कराटे स्पर्धेचा थरार; यशस्वी खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी होणार निवड

0

सांगोला (प्रतिनिधी):सांगोला शहराच्या क्रीडा क्षेत्रात उद्या एक मोठी घडामोड घडणार आहे. निमित्त आहे, ‘स्पोर्ट्स कराटे डो असोसिएशन सोलापूर’ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कॅडेट, ज्युनियर व सब-ज्युनियर अजिंक्यपद कराटे स्पर्धा, गुरुवार दिनांक ३० एप्रिल २०२६ रोजी सांगोला येथील तालुका क्रीडा संकुलात पार पडणार आहेत.

या स्पर्धा केवळ स्थानिक स्तरावर मर्यादित नसून, त्यांना कराटे डू असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि कराटे इंडिया ऑर्गनायझेशन यांची अधिकृत मान्यता प्राप्त आहे. सोलापूर जिल्ह्यातील कराटे खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्यातील कौशल्याला वाव मिळावा, या उद्देशाने या भव्य स्पर्धेचे नियोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा प्रामुख्याने दोन महत्त्वाच्या कता आणि कुमिते क्रीडा प्रकारांत होणार आहे आहे: खेळाडूंचे वयोगट आणि वजनी गट लक्षात घेऊन अत्यंत पारदर्शक पद्धतीने या लढती होतील. यामध्ये सब-ज्युनियर, कॅडेट आणि ज्युनियर अशा विविध श्रेणीतील मुले आणि मुली सहभागी होणार आहेत.

या स्पर्धेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे येथील निकाल. सांगोल्यातील या जिल्हास्तरीय स्पर्धेत जे खेळाडू सुवर्ण आणि रौप्य पदकाचे मानकरी ठरतील, त्यांची थेट निवड नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अजिंक्यपद कराटे स्पर्धेसाठी केली जाणार आहे. यामुळे जिल्ह्यातील कराटेपटूंसाठी राज्याच्या पातळीवर चमकण्याची ही सुवर्णसंधी आहे.

स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना स्पोर्ट्स कराटे डो असोसिएशन सोलापूरचे जिल्हा अध्यक्ष वाघमारे सर यांनी सांगितले की, “जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेत उतरून आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करावे. शिस्त आणि जिद्द या गुणांच्या जोरावर खेळाडूंनी राज्य स्तरापर्यंत मजल मारावी, हाच आमचा मानस आहे.”

सोलापूर जिल्ह्यातील ज्या अधिकृत संघटनांना किंवा वैयक्तिक खेळाडूंना या स्पर्धेत सहभाग घ्यायचा आहे, त्यांनी त्वरित नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी किंवा प्रवेश प्रक्रियेसाठी वाघमारे सर (९९७०६०६९०९) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here