वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध स्पर्धा संपन्न

0

सांगोला ( प्रतिनिधी): आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयाच्या 40 व्या वर्धापन विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या, त्या उत्साही वातावरणात संपन्न झाल्या.

यामध्ये रांगोळी , हस्ताक्षर स्पर्धेत बहुसंख्य विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला तसेच देशभक्तीपर संगीत खुर्चीचे आयोजन केले होते या स्पर्धेस देखील विद्यार्थ्यांनी स्वंयस्फूर्तीने सहभाग घेतला. या स्पर्धेचे आयोजन मुख्याध्यापक विठ्ठलपंत शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन केले होते.

प्रशालेतील विद्यार्थ्यांनी अतिशय सुरेख पद्धतीने रांगोळीचे चित्रे रेखाटली होती, यामध्ये पर्यावरण पूरक, प्रदूषण मुक्त उत्सव, गणेशोत्सव अशा अनेक रांगोळ्या या स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने रेखाटल्या होत्या. स्पर्धा यशस्वीतेसाठी शिक्षकांनी उत्कृष्ट नियोजन केले, या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ प्रशालेच्या 40 व्या वर्धापन दिनानिमित्त विद्यालयात 17 सप्टेंबर रोजी होणार असल्याचे प्रशालेतील वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालय स्पर्धा समितीच्या वतीने देण्यात आली.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here