सांगोला (प्रतिनिधी ): दि. 8 व 9 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक येथे होणाऱ्या पाचव्या वेस्ट झोन कराटे कॉम्पिटिशन सांगोल्याच्या चार मुलांची निवड करण्यात आली आहे आरोही सावंत,वैष्णवी गेजगे, रोहित अरबळी, सिद्धार्थ माने या मुलांची निवड झाली आहे नाशिक येथे होणाऱ्या विविध मान्यताप्राप्त संघटनेचा सहभाग होणार आहे.

या स्पर्धेमधील या स्पर्धा कराटे इंडिया ऑर्गनायझेशनच्या यांच्या मान्यतेने कराटे असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (kam) यांच्या आयोजनाने या स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेतील यशस्वी स्पर्धक राष्ट्रीय स्पर्धेतील भाग घेणार आहेत. या स्पर्धेला सांगोल्यातील चार खेळाडूंची निवड झालेली आहे. हे सर्व कराटे खेळाडू सांगोल्यामध्ये वाघमारे सरांच्या कराटे क्लासवर रोज सराव करत आहेत. सुनील वाघमारे सर, श्रावणी वाघमारे निजेंद्र चौधरी आदींचे मार्गदर्शन लाभत आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक


