जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये युवकांना संधी द्यावी-यश नलवडे

0

 

मा.आमदार शहाजीबापू पाटील यांच्या पाठीशी तरुणांची फळी बळकट.

 

सांगोला (प्रतिनिधी):स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजत असून सांगोला नगरपालिकेची निवडणूक पार पडत असताना लवकरच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकांच्या अनुषंगाने निष्ठावंत तरुणांना निवडणूक लढविण्याची संधी द्यावी अशी मागणी युवा सेनेचे तालुका उपाध्यक्ष यश नलवडे यांनी केली आहे.

यावेळी बोलताना नलवडे म्हणाले की महाराष्ट्र राज्यामध्ये सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षातील मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे आमचे नेते माजी आमदार अँड शहाजीबापू पाटील यांच्या राजकीय वाटचालीमध्ये आमचे युवा सेनेचे तालुका अध्यक्ष दिपक उर्फ गुंडादादा खटकाळे यांच्या माध्यमातून युवकांची सांगोला तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये मोठ्या प्रमाणात निष्ठावंत कार्यकर्त्यांची फौज उभारली आहे.

अशावेळी जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकांचे गणित जुळवत असताना जास्तीत जास्त तरुण उमेदवार द्यावेत अशी मागणी महायुतीतील पक्षश्रेष्ठीकडे करणार असल्याचे यावेळी यश नलवडे यांनी सांगितले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here