समाजकार्याच्या जोरावर संतोष महिमकर निवडणूक रिंगणात
सांगोला (प्रतिनिधी):सांगोला शहर व तालुक्यात समाजकारण करत असताना कधीही कोणती अपेक्षा न बाळगता सामाजिक क्षेत्रात काम करणारे व्यक्तिमत्व म्हणून संतोष माहिमकर यांच्याकडे पाहिले जाते.
ना कोणता राजकीय वारसा,ना कोणाचा पाठिंबा तरीदेखील गेल्या अनेक वर्षांपासून सांगोला शहरातील समाजकारणामध्ये सक्रिय असलेले संतोष महिमकर हे सांगोला नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १० मधून निवडणूक लढविणार आहेत त्यांची उमेदवारी ही सर्वसामान्य जनतेची उमेदवारी असेल असे त्यांनी यावेळी सांगितले.

गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी केलेल्या समाजकार्याचा आढावा घ्यायचा झाला तर समाजकार्यातील त्यांचे योगदान पुढीलप्रमाणे संतोष महिमकर यांचा जन्म १९ ऑगस्ट१९८३ चा असून त्यांचे शिक्षण बी.ए २ पर्यंत झाले आहे संघटित रित्या सामाजिक कार्य करत असताना त्यांनी आपुलकी प्रतिष्ठान सचिव, शहीद जवान बहुउद्देशीय सामाजिक संस्था सचिव, परिवर्तन फाऊंडेशन सचिव या सामाजिक संघटनांवर पदे भूषविली आहेत त्यांच्या या कार्यकाळातील कार्य मेडिकल श्रेत्रात २७ वर्षे कामगार म्हणून कार्यरत आहेत तसेच २०१९साली आपुलकी प्रतिष्ठान या संस्थेमुळे त्यांना सामाजिक कार्य करण्याचा एक प्लॅटफॉर्म मिळाला तेव्हापासुन सामाजिक कार्य करण्यास प्रोत्साहन मिळत गेले १९९८ ते२०२५ आतापर्यंत २७ वर्षाचा मेडिकल क्षेत्रातील कामाचा अनुभव (एन.के.गाडे मेडिकल, सांगोला) कामगार म्हणून ते अविरतपणे जनतेच्या सेवेसी निगडित आहेत तर २०१९ते २० या वर्षी म.बसवेश्वर युवक संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवड या काळात विविध सामाजिक कार्य करण्यात आले. २०१९ते२०२० शहिद अशोक कामटे संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली या.संघटनेत असताना लोकांच्या रेल्वेविषयी समस्या निवेदनाद्वारे मांडण्याचे काम करण्यात आले.
याच वर्षी संघटनेला निजामपुर येथील कै.महादेव आबा लवटे फाउंडेशनच्या आदर्श संघटना पुरस्कार संघटनेस देण्यात आला. त्यांचा कार्यकाळ संपत आल्यावर संघटनेच्या वतीने उत्कृष्ट अध्यक्ष म्हणून गौरविण्यात आले.

कोरोनाच्या महामारीत पहिल्या लाँकडाऊन काळात भटक्या जमाती लोकांना अन्नाचे किट वाटप करण्यात आले २०२० शहीद जवान बहुउदेशीय सामाजिक संस्थेच्या (नवीन संस्था) सचिव पदी निवड या संस्थेचे मागील ४ वर्षात विविध सामाजिक कार्ये करण्यात आली.
वयोवृद्ध महिला निराधार महिला कोव्हीडच्या दुसऱ्या लाटेत आवश्यक अश्या गरजूंना अन्नाचे किट वाटप करण्यात आले. तर अनेक लोकांना दवाखान्यासाठी आर्थिक मदत पण करण्यात आली. या संस्थेच्या वतीने शहीद जवानांनासाठी “अमर स्तंभाचे “उभारण्याचे काम हाती घेतले आहे.जवान सैन्य भरती किंवा सेवा निवृत्त जवानांनाचा सत्कार करण्यात येतो आणि लोकांमध्ये प्रबोधन व्हावे यासाठी सर्व महापुरुषांच्या जयंती करून त्यांचे विचार मांडण्यात येतात.दैनिक दामाजी एक्सप्रेस तर्फे उत्कृष्ट सामाजिक संस्था म्हणून गौरविण्यात आले,२०२१ आपुलकी प्रतिष्ठानच्या सचिव पदि निवड झाल्यानंतर आपुलकी प्रतिष्ठानाने निरधार व्यक्तींना अधार देण्याचे काम करते मागील ३ वर्षात विविध सामाजिक कार्य हातात घेतले आहेत या प्रतिष्ठानच्या माध्यमातून सांगोला शहरात “मोक्षरथ “उपलब्ध करून देण्यात आला आहे या मुळे त्यांना सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली.आपुलकी प्रतिष्ठानला मागील तीन वर्षात उत्कृष्ट सामाजिक संस्था म्हणून दोन-तीन पुरस्कार देखील मिळाले आहेत,तरुण भारत या वृत्तपत्राकडून कोव्हीड काळात लोकांच्या घरी जाऊन आत्याअवश्यक असणाऱ्या औषधांची घरपोच सुविधा दिल्या बद्दल कोव्हीड योध्दा म्हणून गौरविण्यात आले.कोरोना काळात फोन वरून औषधाची व आँक्सिजन माहिती देण्यात येत ह़ोती.

२०२१ साली परीवर्तन फाऊंडेशन याच्या सचिव पदि निवड झाली या फाऊंडेशनच्या वतीने महिलांच्या मासिक पाळी बद्दल महाविद्यालयांमध्ये सेमिनार घेतले जातात , विविध श्रेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या आदर्श व्यक्तींचा सत्कार करण्यात येतो.
या सर्व सामाजिक कार्याची दखल घेऊन सांगोल्यातील “सी.बी.एस. न्यूज” मराठी ,”तुफान क्रांती “या दैनिकांनी यांच्या वर्धापन दिनानिमित्त “समाज रत्न पुरस्कार” व डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान पंढरपूर यांच्या वतीने “महात्मा बसवेश्वर महाराज समाज” भुषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले,२०२५ साली ला बसव प्रतिष्ठान उमरगा यांच्या कडून बसवरत्न पुरस्कार मिळाले
या सर्व सामाजिक संस्थेमुळे त्यांना सामाजिक कार्याची ऐवढी आवड निर्माण झाली आहे की त्यांच्या जवळ कोणही आलेतर त्याचे सामाजिक काम करण्याचा प्रामाणिक पर्यंत नेहमीच असतो.
हा झाला संतोष महिमकर यांच्या सामाजिक सामाजिक कार्याचा संक्षिप्त आढावा यासह त्यांच्या सामाजिक कार्याची अनेक उदाहरणे देता येतील सर्व जाती धर्मातील सर्वसामान्य तळागाळातील जनते सोबत असणारा संतोष महिमकर यांच्या सोबत असलेल्या जिव्हाळ्याचा जोरावर ते सांगोला नगरपालिका सार्वत्रिक निवडणूकी साठी प्रभाग क्रमांक १० मध्ये निवडणूक लढणार असून या प्रभागातील सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी त्यांची उमेदवारी असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

ना कोणता वारसा,ना कुणाचा पाठिंबा तरीदेखील अविरतपणे समाजकार्य सुरूच.!
सांगोला शहरातील समाजकारणामध्ये मोठे योगदान असलेले संतोष महिमकर यांना कोणाचा राजकीय वारसा आहे ना कोणाचा पाठिंबा तरीदेखील त्यांची सर्वसामान्य जनतेसोबत असणारी जुडलेली नाळ ही त्यांच्या जमेची बाजू असून सांगोला नगरपालिका प्रभाग क्र. १० मध्ये ते निवडणूक लढवणार आहेत आणि सर्वसामान्य जनतेच्या विश्वासात पात्र राहून त्यांचा विजय निश्चित असल्याची खात्री यावेळी त्यांनी व्यक्त केली.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



