सांगोला शहर आज बदलाच्या उंबरठ्यावर उभं आहे. अनेक वर्षांपासून विकासाच्या नावाखाली घोषणा, आश्वासनं, टीका-टिप्पणी या गोष्टी घुमत राहिल्या. पण शहराच्या भवितव्यासाठी आवश्यक असलेली थंड, स्थिर, अभ्यासू दृष्टी मात्र लोकांना अनुभवायला मिळाली नाही. शहराचा नकाशा बदलण्यासाठी, लोकांच्या वास्तविक अडचणी सोडवण्यासाठी आणि सांगोला आधुनिक करण्यासाठी आता लोकांतून आवाज उठतोय.*आपल्याला आता विकासाचा गारवा हवा* आणि या गारव्याचा स्रोत म्हणजे विश्वेश झपके.

उच्चशिक्षित, निर्व्यसनी, संस्कारित नेतृत्वाची वेळ आली आहे आजचे राजकारण गोंधळ, वाद, आरोप आणि भावनिक नाटकांवर चालतंय. परंतु शहराला हवे असते शांत, विचारपूर्वक निर्णय घेणारे नेतृत्व. विश्वेश झपके यांची ओळख ही केवळ एका उमेदवारापुरती मर्यादित नाही. ते आहेत उच्चशिक्षित, निर्व्यसनी,संस्कारित, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तंत्रज्ञानाच्या युगाशी जोडलेले आधुनिक युवक.
नागरिकांसोबत राहून, त्यांचे प्रश्न प्रत्यक्ष जाणून घेऊन आणि आधुनिक उपायांची व्यावहारिक समज वापरून काम करण्याची त्यांची तयारी ही सांगोल्याला आज अत्यंत आवश्यक आहे. तंत्रज्ञानाची जाण असलेला नेता म्हणजे विकासाची खात्री आज जग बदलतंय, शहरं डिजिटल होतायत, हरित उपक्रम वाढत आहेत, स्मार्ट व्यवस्थापन हा विकासाचा पाया बनत चाललाय. पण सांगोल्यात अद्यापही अनेक मूलभूत समस्या सुटलेल्या नाहीत. पाण्याचा प्रश्न,स्वच्छतेची समस्या,वाहतूक नियोजनाचा अभाव,रोजगार निर्मिती,शैक्षणिक पायाभूत सुविधा,नागरिकांसाठी तंत्रज्ञानाधारित सेवा या सर्व समस्यांसाठी जुने, पारंपरिक उपाय आता उपयोगाचे नाहीत.सांगोल्याला हवे आहे स्मार्ट नेतृत्व, जे तंत्रज्ञानाचा उपयोग करून शहराची गती वाढवू शकेल.

विश्वेश झपके यांची काम करण्याची पद्धत हाच फरक निर्माण करते.त्यांनी दाखवलेला विकासाचा मार्ग हा आधुनिकतेकडे नेणारा, पारदर्शक व लोकाभिमुख आहे. *सांगोल्यात विकासाचा गारवा निर्माण करण्यासाठी तयार व्हा.*
आज लोक विचारतात.आपण कोणते बटन दाबणार ? पण खरी गोष्ट अशी आहे की, बटण हे फक्त मशीनवर असतं. दिशा मात्र मनात असते. आणि सांगोल्याचं मन सांगतंय यावेळी हवा आहे बदलाचा थंडावा. म्हणूनच… इअर कंडिशनर (AC) बटनावर क्लिक करा. आणि विकासाचा गारवा आपल्या घराघरात पोहोचू द्या.
AC म्हणजे साधं बटन नाही… आपले उमेदवार.. विश्वेश झपके यांच्यासाठीचा जनादेश आहे. का म्हणतात लोक *सांगोल्याला आता AC हवा* कारण… भ्रष्टाचाराच्या गरम वातावरणाला थंड करणारा नेता हवा,वाद वादळांना शांत करणारा अभ्यासू नेतृत्व हवा,भावनांच्या ऊन्हात भाजणाऱ्या राजकारणाला पर्याय हवा,विकासाच्या गारव्यात सांगोल्याने श्वास घ्यायला हवा विश्वेश झपके हे नाव म्हणजे या सर्व समस्यांना उत्तर. त्यांची दृष्टी व्यापक आहे, विचार स्वच्छ आहे आणि उद्दिष्ट फक्त एकच सांगोल्याचा सर्वांगीण विकास.

सांगोल्याला उद्या बदलायचा असेल, तर आज योग्य क्लिक करा. निवडणूक केवळ बटन दाबण्याचा क्षण नसतो. तो असतो शहराच्या भवितव्याचा निर्णय घेण्याचा क्षण. सांगोल्याने अनेक वर्षे वाद, भावनिकतेचे ढग, अशा राजकारणाचे तापमान सहन केले. आता वेळ आहे विकासाच्या AC ला ON करण्याची.आणि त्यासाठी एकच नाव पुरेसं आहे विश्वेश झपके.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



