डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालयाचा ३५ वा वर्धापन दिन व कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३९ वी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न

0

सांगोला (प्रतिनिधी): बुधवार दि .२३ सप्टेंबर रोजी डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला येथे महाविद्यालयाचा ३५ वा वर्धापन दिन व कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३९ वी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला व न्यू इंग्लिश स्कूल पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम, सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या प्रवेश द्वाराचे पूजन करून व स्व.आ.डॉ. गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर स्व.आ. डॉ. गणपतराव देशमुख व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रतिमा पूजनानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर धसाडे यांनी केले. त्यामध्ये त्यांनी असे सांगितले कि महाविद्यालय ३५ व्या वर्षात पदार्पण करत असताना बदललेली शिक्षण पद्धती स्विकारणे आणि रोजगाराच्या संधी विद्यार्थ्यांना मिळवून देणे यावर महाविद्यालयचा अधिक भर असेल. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांची ओळख महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या विभाग प्रमुख प्रा.डॉ.सौ. शितल शिंदे यांनी करून दिली. प्रमुख पाहुण्यांच्या ओळखीनंतर प्रमुख मान्यवरांच्या सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर डॉ. दिनेश शिंदे, डॉ. गणेश वाघ, डॉ. बाबासाहेब शिंदे, कु. प्रतिभा जोग यांसारख्या महाविदयालयामध्ये यशस्वी झालेल्या अनेक विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. डॉ. प्रभाकर कोळेकर समन्वयक, पीएम-उषा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि डॉ. गणपतराव देशमुख सारख्या तत्वनिष्ठ माणसाने स्थापन केलेल्या संस्थेत मला बोलताना खूप गौरव वाटतो. शिक्षण क्षेत्रात आलेले खाजगीकरण, अपुरे फंडिंग या सारखी अनेक आवाहने संस्थेने स्वीकारून पुढे गेले पाहिजे. ग्लोबल समस्येपेक्षा स्थानिक समस्या सोडवण्यावर सर्वांचा भर अधिक असला पाहिजे. त्यासाठी समायोजन, प्रबोधन, सातत्य याचा वापर करून अनेक समस्या सोडवल्या पाहिजेत. प्रमुख पाहुण्यांच्या भाषणानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अनिकेत(भैय्या) देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये त्यांनी असे सांगितले कि शिक्षणाबद्दल आणि श्रमाबद्दल कर्मवीर अण्णांना खूप अस्था होती. शिक्षणाची गंगा खेड्यापाड्या पर्यंत पोहचवण्यासाठी डॉ. गणपतराव देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले होते. शिक्षण, व्यायाम, आरोग्य यावर विद्यार्थ्यांनी विशेष भर दिला पाहिजे असे सांगितले. सोशल मीडिया व आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांचा वापर योग्य प्रमाणात असावा असे त्यांनी सांगितले.

कर्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेच्या संचालिका डॉ. सौ. आस्था अनिकेत देशमुख, संस्थेचे सचिव मा. श्री. विठ्ठलराव शिंदे, संस्था सदस्य मा.श्री. अवधूत कुमठेकर, संस्था सदस्य मा.डॉ. अशोक शिंदे, संस्था सदस्य मा.श्री. दिपक खटकाळे, संस्था सदस्य मा.श्री. जयंत जानकर व न्यू इंग्लिश स्कूल व ज्यू. कॉलेजचे प्राचार्य प्रा. केशन माने, माजी नगरसेवक गजानन बनकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. डॉ. सौ. शितल शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.डॉ.जे.व्ही. ठोंबरे व प्रा. शेख एन. एस यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी विशेष परिश्रम घेतले होते. अशी माहिती प्रसिद्धी कमिटीचे चेअरमन प्रा. बाळासाहेब सरगर यांनी दिली आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here