‘माणगंगा ॲग्रो मार्ट ई-ॲग्री’ दुकानाचा आज भव्य उद्घाटन सोहळा

0

सांगोला (प्रतिनिधी): शेतकऱ्यांना दर्जेदार कृषी निविष्ठा, अत्याधुनिक कृषी सेवा व एकाच ठिकाणी सर्व कृषी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने माणगंगा परिवार फार्मर प्रोड्युसर कंपनी व पालवी ॲग्रीको संचालित “माणगंगा ॲग्रो मार्ट ई- ॲग्री दुकान” याचे भव्य उद्घाटन शुक्रवार, दि. 31 जुलै 2026 रोजी दुपारी 1.00 वाजता कडलास नाका, सांगोला येथे संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन परमपूज्य श्री सद्गुरू कोंडीब महाराज श्री क्षेत्र शिरूर यांच्या शुभहस्ते होणार असून कार्यक्रमास सांगोला तालुक्याचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, माजी आमदार ॲड. शहाजीबापू पाटील, माजी विधानपरिषद सदस्य श्री दीपक आबा साळुंखे पाटील, जिल्हा परिषद सोलापूरचे शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती श्री चेतनसिंह केदार सावंत, सांगोला नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री आनंदभाऊ माने तसेच उपनगराध्यक्ष श्री नितीन (आबासाहेब) इंगोले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

माणगंगा ॲग्रो मार्टच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते, औषधे, कृषी अवजारे तसेच आधुनिक शेतीसाठी आवश्यक मार्गदर्शन व सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असून हा उपक्रम परिसरातील शेतकऱ्यांसाठी निश्चितच लाभदायी ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

या उद्घाटन समारंभास शेतकरी, सभासद, ग्राहक, व्यापारी, कृषी क्षेत्रातील मान्यवर तसेच सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन माणगंगा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष तसेच सांगोला नगरपालिकेचे उपानगराध्यक्ष श्री नितीन (आबासाहेब) इंगोले यांनी केले आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here