शहीद अशोक कामटे संघटनेच्यावतीने किल्ले बांधणी स्पर्धेचे 26/11 रोजी बक्षीस वितरण

0

सांगोला ( प्रतिनिधी): सांगोला शहर व तालुक्यात सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने प्रतिवर्षीप्रमाणे भव्य तालुकास्तरीय किल्ले स्पर्धा 2025 चे आयोजन करण्यात आले होते.

सांगोला शहर व तालुक्यातील लहान- थोरांना दीपावलीच्या आगमनाला किल्ले बनवण्याचा मोठा छंद आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य संपूर्ण विश्व तलावर ज्ञात असून येणाऱ्या पुढच्या पिढीला गडकिल्ल्यांच्या माध्यमातून हे कार्य सातत्याने पुढे पोहचवत आहे याकरता शहीद अशोक कामटे सामाजिक संघटना सातत्याने अशा विधायक उपक्रमांना गेल्या 16 वर्षापासून सातत्याने प्रोत्साहन देण्याचे काम करते प्रतिवर्षीप्रमाणे दिवाळी सुट्टीत किल्ले बांधणी, किल्ले सजावट स्पर्धा 2025 करिता शहरातील अनेक बालकलाकारांनी या भव्य स्पर्धेत आपला उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. या किल्ला स्पर्धांचे परीक्षण सर्व परीक्षकामार्फत करण्यात आले.

या सर्व स्पर्धेचे बक्षीस पारितोषिक वितरण समारंभ शहीद दिन 26/11/2025 रोजी संघटनेच्या कार्यालयात दुपारी तीन वाजता संपन्न होणार आहे सदर कार्यक्रमाचे बक्षीस वितरण प्रमुख पाहुणे पुणे पोलीस कमिशनरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी अस्लम सय्यद,कवठेमहांकाळ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अमोल शिवशरण यांच्या हस्ते होणार व विनोबा भावे नगर मुंबईचे पोलिस उपनिरीक्षक रमेश जाधव साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे तरी या कार्यक्रमास सर्व स्पर्धकांनी वेळेवर उपस्थित राहावेअशी माहिती शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने देण्यात आली.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here