कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयामध्ये,फुड सायन्स विभागामार्फत संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या स्थापनेच्या स्मरणार्थ १६ ऑक्टोबर रोजी जागतिक अन्न दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वर्षी ‘चांगल्या अन्नासाठी, चांगल्या भविष्यासाठी’ Foods and a Better Future) या संकल्पनेवर आधारित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना अन्न सुरक्षा, सकस आहार आणि अन्नाची नासाडी टाळण्याबद्दल जागरूक करणे हा होता.

यावेळी विद्यार्थ्यांनी जागतिक भूक, कुपोषण, शाश्वत शेती आणि अन्नसुरक्षा या विषयांवर आधारित आकर्षक पोस्टर्स तयार केली होती. या पोस्टर्समधून त्यांनी अन्नाचे महत्त्व प्रभावीपणे मांडले.यावेळी प्रमुख
अतिथी म्हणून ,श्री. विजय पाटील व संजय शिंदे ,यांनी विद्यार्थ्यांना अन्नाचे आरोग्यविषयक महत्त्व, पौष्टिक आहाराची गरज आणि अन्न वाया न घालवण्याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, निरोगी समाजासाठी सकस आहार किती महत्त्वाचा आहे. यावेळी,महाविद्यालयाचे प्र .प्राचार्य डॉ .बाळासाहेब बलवंत ,उप प्राचार्य भगवान नाईकनवरे प्रा. उप प्राचार्य राजेश कवडे, प्रा .डॉ नवनाथ पिसे प्रा डॉ प्रशांत नलवडे प्रा.डॉ समाधान माने प्रा डॉ.अमर कांबळे प्रा डॉ. सुशील शिंदे प्रा. डॉ उमेश साळुंखे यांनी या उपक्रमांचे कौतुक केले. ते म्हणाले, “अन्नाची किंमत समजून घेणे आणि गरजू लोकांना मदत करणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमांमध्ये सहभाग घेणे हे एक सुजाण नागरिक म्हणून त्यांच्या विकासासाठी आवश्यक आहे”.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागप्रमुख प्रा .तेजस चौगुले प्रा.राजेश कवडे प्रा. जानकर मॅडम. प्रा नितीन कांबळे आणि विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अन्नसुरक्षेबद्दल जागरूकता वाढली आणि अन्नाचा आदर करण्याची भावना निर्माण झाली.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक


