माणगंगा परिवार अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या वतीने सभासदांना दिवाळी किट वितरण कार्यक्रम संपन्न 

0

सांगोला (प्रतिनिधी):  मानगंगा परिवार अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सर्व सभासदांना लाभांशाच्या स्वरूपात दिवाळी किट वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

सदर कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री. नितीन इंगोले साहेब, संचालक श्री. विवेक घाडगे सर, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अक्षय मुढे साहेब, तसेच संस्थेचे मार्गदर्शक श्री. मच्छिंद्र महादेव जाधव (गुरुजी), नारायण निवृत्ती काटकर , विलास तुकाराम दणके, धनंजय महादेव घाडगे, अंकुश दत्तात्रय लेंडवे, भारत नामदेव चव्हाण, अमर विजय घाडगे, अमित दत्तात्रय थोरात, अनिल बाळासो घाडगे हे मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी मान्यवरांनी संस्थेच्या सातत्याने वाढत असलेल्या व्यवसायिक प्रगतीचा आलेख पाहून समाधान व्यक्त केले तसेच सर्व अधिकारी, कर्मचारी आणि सभासदांचे कौतुक करत संस्थेच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

संस्थेच्या या उपक्रमामुळे सभासदांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, समाजाभिमुख कार्यपद्धतीचा आदर्श ठेवत संस्था आपल्या “सभासद प्रथम” या तत्त्वावर पुढे वाटचाल करत असल्याचे स्पष्ट झाले.माणगंगा परिवाराकडून सर्व सभासदांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here