जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कमलापूर येथे नवोदय सराव परीक्षा संपन्न

0

कमलापूर (प्रतिनिधी): आज दि. 30 नोव्हेंबर रोजी प्रसन्न नवोदय फाउंडेशन पुणे अकलूज व जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा कमलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 13 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या नवोदय विद्यालय पूर्व परीक्षा या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर नवोदय सराव सेमी फायनल परीक्षेच्या आयोजन करण्यात आले होते.

सदर परीक्षेचे उद्घाटन शिक्षणाचे आराध्य दैवत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन दैनिक माणदूत एक्सप्रेस या वृत्तपत्राचे मुख्य संपादक मोहन मस्के सर यांच्या हस्ते करण्यात आले.सदर उद्घाटन प्रसंगी मुख्याध्यापक श्री बशीर जैनुद्दीन मुलाणी गुरुजी, श्री सिद्धनाथ धुकटे गुरुजी, मौजे कमलापूर चे माजी सरपंच श्री बाबुराव बंडगर, माजी उपसरपंच श्री देविदास अण्णा ढोले, सेवानिवृत्त शिक्षक श्री तानाजी केदार, गुरुजी शिक्षक नेते श्री केशवराव घोडके गुरुजी, श्री आबा पांढरे गुरुजी, श्री रामचंद्र तंडे गुरुजी सर्व ग्रामस्थ आणि मंगळवेढा, जत, कवठेमंकाळ, तासगाव,सांगोला, आटपाडी या भागातील शिक्षक आणि पालक बहुसंख्येने उपस्थित होते.

ग्रामीण भागातील मुलांमध्ये असणाऱ्या सुप्त गुणांचा विकास तसेच कला कौशल्याचा विकास व्हावा केंद्र सरकारतर्फे घेतल्या जाणाऱ्या नवोदय सैनिक स्कूल यासारख्या परीक्षा ग्रामीण भागातील मुले सहज उत्तीर्ण होतील एवढी उच्च गुणवत्ता ग्रामीण भागातील मुलांच्या मध्ये असते फक्त त्यासाठी मुलांचा सराव होणे अत्यंत गरजेचे आहे त्या दृष्टिकोनातून प्रसन्न नवोदय फाउंडेशन व जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा कमलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने या नवोदय सेमी फायनल परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले होते. भविष्यामध्ये अशाच प्रकारच्या सराव परीक्षांचे आयोजन करण्याचा मानस आहे त्यामध्ये ऑल इंडिया सैनिक स्कूल तसेच इतर सैनिक स्कूल इयत्ता चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा दमानी एज्युकेशन फाउंडेशन द्वारे चालवण्यात येणाऱ्या लोणावळा शाळा सरस्वती विद्या अकॅडमी यासाठी सराव परीक्षा घेण्याचे प्रस्तावित आहे. कार्यक्रमाची प्रास्ताविक आदर्श शिक्षक बंडगे गुरुजी यांनी केले आणि सदर परीक्षेचे महत्त्व श्री सुनील आदलिंगे गुरुजी यांनी सांगितले सदर परीक्षा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली.

सदर परीक्षेसाठी पर्यवेक्षक म्हणून सौ इंगोले मॅडम, सौ सारिका ढोले मॅडम, सौ वंदना ढोले मॅडम, सौ जाधव मॅडम, सौ पुनम बंडगर मॅडम, सौ ललिता बंडगर मॅडम यांनी काम पाहिले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here