घेरडी परिसरातील लाडक्या बहिणीसाठी मोफत EKYC करून मिळणार
प्रतिनिधी (शशिकांत कोळी): श्रीनिवास दादा करे व मित्र परिवार हा नेहमी सामाजिक कार्य घेरडी परिसरासाठी अगदी आपले म्हणून नेहमी कार्य करीत असतात.

एवढेच नाही तर युवकांनी नवीन उद्योग व्यवसाय उभे करावेत म्हणून मायाक्कादेवी अर्बन को ऑफ क्रेडिट सोसायटी च्या माध्यमातून उदयोग व्यवसायासाठी, दुग्ध व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देणे, विविध मंडळाना स्पर्धा घेण्यासाठी बक्षीस देणे त्यांच्या कार्यांना चालना देणे, अन्नदान करण्यासाठी विविध मंडळाना सहकार्य करणे अश्या विविध कार्य ते आपले घेरडी परिसऱासाठी आपण काही तरी देणे लागतो म्हूणन ते अविरत पणे कार्य करत असतात.

त्याचाच एक भाग म्हणून आता त्यानीं ज्या लाडक्या बहिणी महिलांना राज्य शासना कडून लाडकी बहीण योजनेमार्फत 1500 रुपये मिळतात त्यांना आता शासनाने EKYC केल्या शिवाय पुढील हप्त्ता मिळणार नाही असे जाहिर केले असल्यामुळे. ज्या महिलांनी अजुन लाडकी बहीण योजनेसाठी EKYC मोफत करून देणार असल्याचे युवक नेते श्रीनिवास करे यांनी आव्हान केले आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे महिलेचे आधार कार्ड, पतीचे आधार कार्ड किंवा वडिलांचे आधार कार्ड, आधार लिंक मोबाईल नंबर. यासाठी पत्ता व संपर्क मायाक्कादेवी अर्बन महिला को ऑफ. क्रेडिट सोसायटी लि. घेरडी. ता सांगोला. प्रशिक गंगणे.मो. 9689966921, किरण माने.मो.9175461362,साहिल यमगर. मो.8552802125. संपर्क साधावा.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक


