सांगोला शहरातील मिरज रोडवरील रेल्वे बोगदा मार्ग दोन महिन्यांसाठी बंद

0

सांगोला (प्रतिनिधी ): सांगोला शहर व तालुक्यातील नागरिकांना कळविण्यात येते की, सांगोला-मिरज रोडवरील रेल्वे बोगदा (गेट क्र. ३२) हा भुयारी मार्ग दिनांक ०१ नोव्हेंबर २०२५ ते दिनांक ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीसाठी रेल्वे विभागामार्फत दुरुस्तीची कामे करण्याकरीता बंद ठेवण्यात येणार आहे.

त्याअनुषंगाने सदरच्या भुयारी पुढील दोन महिने कालावधीसाठी सर्व प्रकारची वाहतूक शहरातील इतर पर्यायी मार्गावरून वळविण्यात येत आहे. पर्यायी मार्गाचा अवलंब करुन वाहतुक कोंडी होणार नाही या करीता प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन मुख्याधिकारी नगरपरिषद सांगोला यांनी केले आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here