प्रतिनिधी (शशिकांत कोळी): जिल्हा परिषद गणामध्ये नागरिकांतून माजी पंचायत समिती सदस्य घेरडी, माजी सरपंच मेडशिंगी दिवंगत अध्यक्ष अरुण (भाऊ) रुपनर यांनी गाजवलेला काळ आणि त्यांच्या प्रत्येक लोकांना केलेली मदत त्यांनी आपले कार्यक्षेत्रात व कार्यक्षेत्र सोडून संपूर्ण सांगोला तालुक्यात प्रत्येक नागरिकांची त्यांच्या अडीअडचणीची कामे केली आहेत अजूनही लोक आठवण काढतात.

अध्यक्ष अरुण रुपनर यांचे चिरंजीव अक्षय रुपनर यांनी लोकांची कामे केले आहेत त्यात त्यांनी 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीची शेतकऱ्यांच्या अडकलेल्या पैसे त्यांच्या खात्यावर पाठपुरावा करून वर्ग करण्यात आला त्यानंतर त्यांनी मेडशिंगी आलेगाव रस्तावर पडलेला मोठा धोकादायक खड्डा होता व संपूर्ण रस्ता नवीन करून संबंधित बांधकाम खात्याकडे मागण्यात आलता व तो लवकर पूर्ण करण्यात आला. तसेच मेडशिंगी ते आलेगाव रोड लगतचे विहिरीचा कठडा तेथील शेतकरी वारंवार पत्र देऊनही पूर्ण होत नव्हता तेव्हा त्यांनी सांगितल्यानंतर अक्षय रुपनर यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला निवेदन देण्यात आले. त्यानंतर ते काम देखील पाठपुरावा नंतर पूर्ण झाले तसेच रस्त्यालगतच्या झाडाझुडपे जाणार येणाऱ्याना अडथळा असून तेही काढण्यात आले.
मेडशिंगी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शाखेचे नूतनीकरण करण्यात आले, त्यांनी केलेल्या मेडशिंगी गावातील काम डासांच्या साठी ग्रामपंचायत कडे मागणी करुन त्यावर उपाययोजना म्हणून फोकिंग मशीन ने धुर करणे निवडणुकीकडे लक्ष न देता घेरडी गावातील लोकांची कामे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे काम तेथील शिवसैनिकांना सोबत घेऊन काम करत, तेथील शिवसैनिकांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शालेय साहित्य व खाऊ वाटप घेरडी गावातील जिल्हा परिषद शाळेला व आश्रम शाळा येथे करण्यात आले तसेच पक्षाचे कार्यक्रम करण्यात आले. धर्मवीर आनंद साहेबांची जयंती देखील उत्साहात साजरी करण्यात आली.

मेडशिंगी गावात तब्बल १० दिवस पाणी सुटले नसताना नागरिकांचे जुलै महिन्यात हाल सहन करावं लागतं होतं त्यावेळी अक्षय अरुण रुपनर यांनी घागर मोर्चा आंदोलनाचे निवेदन देताच अवघ्या ३ दिवसांत पाणी सोडण्यात आले. त्यानंतर जीवन प्राधिकरणाचे पाणी घेण्यात आले तेव्हा देखील त्यांनी त्याकामात सहकार्य केलं, 2023 मध्ये विद्यार्थ्यांनी बस न थांबल्याने विद्यार्थींनी अक्षय रुपनर यांना फोन केला असता, ५० हून अधिक विद्यार्थ्यांचे एसटी वेळेवर न मिळाल्याने दररोज शैक्षणिक नुकसान होत होते. ही विद्यार्थ्यांची अडचण ओळखून अक्षय अरुण रुपनर यांनी सांगोला वसस्थानक प्रमुख पाटील यांची भेट घेऊन याची माहिती दिली. त्यांनी त्वरित दुसऱ्या दिवसापासून दररोज सकाळी सात वाजता बससेवा सुरू केली होती आता देखील सुरू आहे.
मेडशिंगी गावातील भुयारी गटारी करण्यात यावी असं अक्षय अरुण रुपनर यांनी निवेदन दिले होते त्यानंतर आराखडा समाविष्ट होऊन ते आज काम पूर्ण झालं, गावातील लोहार घरापासून पाटील घरापर्यंतच्या पाईप लाईनच्या पाण्यातून वास येत होता तेव्हा अक्षय रुपनर यांनी निवेदन देण्यात आले ते काम लगेच पुर्ण करण्यात आले.
हातिद ते हटकर मंगेवाडी, मानेगाव, जवळा, तंरगेवाडी, घेरडी या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी गणेश घाडगे व अक्षय अरुण रुपनर यांनी निवेदन दिल्यानंतर त्वरित खड्डे बुजविण्यात आले त्यानंतर नवीन रस्ता करण्यात आलं.

महाराष्ट्र शासन युतीचे असताना १९९७ साली त्यावेळचे शिवसेना तालुकाप्रमुख अरुण रूपनर यांनी युती शासनाकडून मेडशिंगीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करून घेतले होते. परंतु, आर्थिक निधीमुळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम रेंगाळले होते. नंतर हे आरोग्य केंद्र पूर्ण बांधून तयार आहे. परंतु, या दवाखान्यात सर्व उपचार केले जात नाहीत. पण, कोरोना काळाच्या काही वर्षांपूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्र मेडशिंगीची नवीन इमारतीत बांधलेली होती. फक्त २०२० साली कोरोना काळात प्राथमिक आरोग्य केंद्र, मेडशिंगी हे केंद्र चालू होते. तदनंतर मिलिंद शंभरकर जिल्हाधिकारी यांनी बंद असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र, मेडशिंगी यास भेटदेखील दिली होती. त्यानंतर ओपीडी अपूर्ण क्षमतेने तसेच सर्व सोयीसुविधा उपलब्ध नाहीत त्यामुळे मेडशिंगी, आलेगाव, वाणीचिंचाळे,वाकी (घेरडी), बाबरवाडी, बुरलेवाडी, राजापूर, सातपुते वस्ती या गावांतील ३२ हजार नागरिकांना सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात जावे लागते. चालू करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करून जिल्हा आरोग्य अधिकारी नवले साहेब यांच्या संपर्क साधून, तालुका आरोग्य अधिकारी यांना भेटून पाठपुरावा करण्यात आला.

अक्षय अरुण रुपनर यांचे कार्य पाहता असं कोणीही विचार देखील करु शकत नाही की पुढे निवडणूक आहेत अन् काम करतो, त्यांच्या कामातून दिवंगत अध्यक्ष अरुण भाऊ रुपनर यांच्या विचारांची, कामाची छाप लोकांना दिसून येते. अजूनही लोकांच्या तोंडातून अध्यक्ष अरुण भाऊ रुपनर यांचं नाव वारंवार निघते त्यांनी केलेलं काम लोक आठवण काढत सांगतात.
वाढेगाव ते सांगोला जुना नॅशनल हायवे रस्त्यावर भरपूर खड्डे व रस्त्याच्या बिकट अवस्था पाहून त्यावर लोक जिव मुठीत घेऊन प्रवास करतात त्याच मार्गाने वाणी चिंचाळे, घेरडी, वाकी घेरडी, आलेगाव, मेडशिंगी, वाढेगाव, तसेच मंगळवेढा व सोलापूरला जाण्यासाठी बसेस ह्या मार्गाने जात असून अक्षय रुपनर यांच्याकडे लोकांनी विद्यार्थी व तरुण वर्गाने मागणी केल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकारी यांनी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात काम होईल असे सांगण्यात आले तदनंतर काम झाले नसताना त्यांनी निवेदन देण्यात आले तेव्हा अधिकारी यांनी वर्कऑर्डर बाकी आहे असे सांगण्यात आले.
ह्या सर्व कारणांमुळे जिल्हा परिषद गटामध्ये मधील लोक त्यांच्या नावाची चर्चा करत आहेत अन् त्यांच्याकडे आग्रह धरत आहेत की तुम्ही निवडणूक लढवावी आमची इच्छा आहे. अक्षयने खूप चांगला वारसा जपला, आमच्या अध्यक्षाची आठवण आली अश्या प्रतिक्रिया व अरुण भाऊ वर प्रेम करणारा एक कार्यकर्ता आहे, वडिलांच्या आठवण आजही आमच्या हृदयात आहे असं लोक म्हणतात. कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असो.निवडणूक लढवावी असे लोक म्हणतात, पण लोकांचं लक्ष अक्षय अरुण रुपनर यांच्या निर्णयाकडे लक्ष लावून आहेत.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



