शेतकऱ्यांसाठी आधुनिक कृषी सेवा व दर्जेदार कृषी निविष्ठांचे नवे केंद्र
सांगोला (प्रतिनिधी): माणगंगा परिवार फार्मर प्रोड्युसर कंपनी व पालवी ॲग्रीको संचालित “माणगंगा ॲग्रो मार्ट ई-ॲग्री दुकान” याचे भव्य उद्घाटन आज कडलास नाका, सांगोला येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. पंचक्रोशीतील शेतकरी, सभासद, ग्राहक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन परमपूज्य श्री सदगुरु कोंडीबा महाराज यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. कार्यक्रमास सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, माजी आमदार ॲड. शहाजीबापू पाटील, माजी विधानपरिषद सदस्य श्री दीपक आबा साळुंखे पाटील, जिल्हा परिषद सोलापूरचे शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती श्री चेतनसिंह केदार सावंत, पंचायत समिती सांगोल्याच्या सभापती सौ. पूनमताई इंगोले, पंचायत समिती मंगळवेढ्याच्या सभापती सौ. दिपालीताई ताड, पंचायत समिती सांगोल्याचे उपसभापती श्री अजय सरगर, जिल्हा परिषद सदस्य श्री योगेश खटकाळे, श्री अतुल पवार, श्री दादासाहेब लवटे, तालुका कृषी अधिकारी सौ. दिपाली जाधव, सांगोला नगरपरिषदेचे लोकनियुक्त अध्यक्ष श्री आनंदभाऊ माने, उपाध्यक्ष तथा माणगंगा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष श्री नितीन (आबासाहेब) इंगोले, सांगोला नगरपालिकेचे गटनेते श्री प्रशांत धनवजीर, श्री रमेश जाधव, उद्योगपती व भाजप नेते श्री बाळासाहेब एरंडे, नगरसेविका सौ. तनुजा एरंडे, प्रगतशील बागायतदार श्री बाळासाहेब वाळके, माणगंगा परिवाराचे संचालक श्री सचिन इंगोले, व्ह चेअरमन श्री सुखदेव रंदवे साहेब, श्री विजय वाघमोडे साहेब, श्री महादेव बुरुंगले, श्री नारायण काटकर, श्री दत्तात्रय जानकर, श्री कुंडलिक शेळके, श्री अनिल घाडगे, श्री नामदेव सिद, श्री सुदीप बेले, गंगाई डेरीचे चेअरमन श्री अरुण सुरवसे साहेब तसेच ब्रह्मचैतन्य कन्स्ट्रक्शनचे श्री सुधीर सुरवसे साहेब यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.

यावेळी प्रगतशील बागायतदार श्री बाळासाहेब वाळके यांनी आपल्या मनोगतात माणगंगा ॲग्रो मार्ट ई-ॲग्री दुकान हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त उपक्रम असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना आधुनिक शेतीविषयक मार्गदर्शन, दर्जेदार कृषी निविष्ठा, योग्य दरात शेतीसाठी आवश्यक साहित्य आणि तांत्रिक सेवा त्यांच्या बांधापर्यंत उपलब्ध व्हावी, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल त्यांनी माणगंगा ॲग्रो मार्टचे मनःपूर्वक अभिनंदन करत आयोजकांचे आभार व्यक्त केले.

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी वाढत्या रासायनिक फवारणीमुळे मानवी आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांविषयी उपस्थितांना मोलाचा संदेश दिला. रासायनिक औषधांचा संतुलित व शास्त्रीय पद्धतीने वापर करून सुरक्षित आणि शाश्वत शेती करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच माणगंगा ॲग्रो मार्ट ई-ॲग्री दुकानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दर्जेदार सेवा, योग्य मार्गदर्शन आणि विश्वासार्ह कृषी साहित्य उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त करत या उपक्रमाच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या उद्घाटन सोहळ्यास पंचक्रोशीतील शेतकरी, व्यापारी, सभासद, ग्राहक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद दिला. उपस्थित मान्यवरांनी माणगंगा परिवाराच्या या उपक्रमाचे कौतुक करत शेतकरीहितासाठी सुरू करण्यात आलेल्या या प्रयत्नास शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. निकिता कोळी यांनी प्रभावीपणे पार पाडले, तर श्री विवेक घाडगे (संचालक, माणगंगा परिवार) यांनी आभार प्रदर्शन केले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माणगंगा परिवार फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या सर्व संचालीक सौ. अर्चनाताई इंगोले सौ संजीवनी घाडगे, सौ जया वाघमोडे, सौ सुरेखा रंदवे, सौ रोहिणी इंगोले, सौ मनीषा सुरवसे, माणगंगा परिवार अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे संचालक मंडळ, सर्व पदाधिकारी, माणगंगा परिवाराचे सर्व कर्मचारीवृंद, पालवी ॲग्रीकोचे प्रतिनिधी, स्वयंसेवक, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी तसेच उपस्थित सर्व मान्यवर, शेतकरी, सभासद आणि नागरिक यांचे संयोजकांच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



