प्रा. डॉ. दत्तात्रय काळेल यांना ‘कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार’ प्रदान

0

सांगोला (प्रतिनिधी):शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या माढा येथील कला व वाणिज्य महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. दत्तात्रय काळेल यांना ‘कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार २०२६’ देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले.

पुणे येथील पत्रकार भवनात आयोजित भव्य मानवाधिकार परिषदेत हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना, जागतिक शांती परिषद आणि भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण यांच्या शुभहस्ते डॉ. काळेल यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.या प्रसंगी मा. अशोक कुमार पगारिया (संस्थापक अध्यक्ष, प्रीतम प्रकाश महाविद्यालय, पुणे), प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर, डॉ. संजय कांबळे (राष्ट्रीय अध्यक्ष, भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघ), प्रो. डॉ. गोरख साठे (आयोजक) आदी मान्यवर उपस्थित होते

ग्रामीण भागात शिक्षण आणि समाजसेवेचे व्रत जपणाऱ्या डॉ. काळेल यांच्या या यशामुळे शैक्षणिक वर्तुळात तसेच ग्रामीण भागातून त्यांच्यावर अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. रयत शिक्षण संस्थेच्या परंपरेला साजेसा हा सन्मान मिळाल्याबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here