सांगोला (प्रतिनिधी): खंडागळे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने हॉस्पिटलचा वर्धापन दिन आणि वैद्यकीय सेवेला यशस्वी १३ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एका विशेष आरोग्य मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा परवडणाऱ्या दरात मिळावी या उद्देशाने शनिवार, दिनांक २५ जुलै २०२६ ते सोमवार, दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत अत्यंत अल्प दरात विविध शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.

या शिबिरादरम्यान सामान्य शस्त्रक्रियांसोबतच आधुनिक दुर्बिणीद्वारे देखील शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. तसेच रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना बिलामध्ये सूट देण्यात येणार आहे.
नॉर्मल डिलेव्हरी, सिझेरियन (डिलिव्हरी), कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया, अपेंडीक्स ऑपरेशन, हर्निया ऑपरेशन, मुळव्याध, फिच्युला व फिशर, सुंता आणि गर्भाशयाची पिशवी साफ करणे. तसेच दुर्बिणीद्वारे अपेंडीक्स ऑपरेशन, कुटूंब नियोजन आणि गर्भाशयाची पिशवी काढण्याची शस्त्रक्रिया इ शस्त्रक्रिया अल्प दरात केल्या जातील

आय.सी.यु. मध्ये ॲडमिट असलेल्या रुग्णांच्या हॉस्पिटल बिलात ५०% थेट सवलत दिली जाईल. इतर कोणत्याही आजारांसाठी रुग्णालयात ॲडमिट होणाऱ्या रुग्णांनाही हॉस्पिटल बिलात ५०% सवलत मिळणार आहे.(टिप: मेडिकल, भूल आणि लॅबचा खर्च नियमानुसार वेगळा राहील.)
गोरगरीब व गरजू रुग्णांनी या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. परेश खंडागळे आणि डॉ. स्वाती खंडागळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी 7741807957, 9689989090 या नंबर वर संपर्क करावा.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



