घेरडी जिल्हा परीषद गटातून सौ वंदना रामचंद्र घुटूकडे यांचे नाव चर्चेत

0

न्यू राष्ट्रीय समाज पार्टी मधून उमेदवारी जाहिर

सांगोला (प्रतिनिधी )- सांगोला तालूक्यातील राजकारण दिवसेंदिवस बदलत आहे. तरी सांगोला विधासभा, माढा लोकसभा लढवलेली न्यू राष्ट्रीय समाज पार्टीने घेरडी जिल्हा परीषद उमेदवार म्हणून सौ वंदना रामचंद्र घुटूकडे यांची उमेदवारी जाहिर केली आहे.

धनगर बहुल लोकसंख्या असणाऱ्या या जिल्हा परीषद गट मध्ये सौ वंदना रामचंद्र घुटूकडे यांच्या उमेदवारीने नवीन चुरस निर्माण झाली आहे. माढा लोकसभा मतदार संघातून तब्बल ५८ हजार मतदान घेतलेले इंजि रामचंद्र घुटूकडे यांच्या त्या पत्नी आहेत. घरातूनच सामाजिक कार्याचा वरसा मिळाल्याने आजून प्रोत्साहन मिळत आहे. सध्या त्या सामता परीषद सांगोला तालूका अध्यक्ष म्हणून काम करीत आहेत.महिला बचत गटाच्या सचिव म्हणून काम करीत आहेत.

न्यु राष्ट्रीय समाज पार्टीच्या माध्यमातून जिल्हा परीषद गटातून तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. पुढील प्रतिस्पर्धी आजून जाहिर न झाल्याने या गटात सध्या संभ्रम आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here