सांगोला (प्रतिनिधी): खिलारवाडी ता. सांगोला येथील चि. निमिष नवनाथ काळेल याची सोलापूर जिल्हा 14 वर्षे खालील क्रिकेट संघामध्ये पहिल्याच प्रयत्नामध्ये निवड झाली आहे. ग्रामीण भागातून कष्टातून त्याने हे यश मिळवल्याबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

तो सध्या मॉडेल क्रिकेट अकॅडमी इंदिरा गांधी स्टेडियम सोलापूर येथे प्रशिक्षक सत्यजित जाधव, रोहित जाधव व प्रवीण देशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे.
निमिष हा खिलारवाडी येथील प्रगतशील बागायतदार श्री. मारुती काळेल व सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनचे माजी चेअरमन व माजी जिल्हा परिषद सदस्य स्वर्गीय बाबासाहेब करांडे यांचे नातू तसेच कला व वाणिज्य महाविद्यालय माढा येथील राज्यशास्त्र विभाग प्रमुख व प्रोफेसर डॉ. दत्तात्रय काळेल यांचे पुतणे आहेत.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक


