सौंदर्यवती स्पर्धेत सांगोल्याच्या सायली कांबळेला ११ हजार रुपयाचे प्रथम पारितोषिक 

0

सांगोला ( प्रतिनिधी )- दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विटा शहरात गवळी प्रतिष्ठानच्या वतीने नुकताच विटा महोत्सव मोठ्या थाटात पार पडला. या महोत्सवात विविध कार्यक्रमाबरोबरच राज्यस्तरीय सौंदर्यवती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत राज्यभरातील जवळपास ४० सौंदर्यवतींनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेमध्ये मॉडेल आणि ब्युटीशियन यांच्या संयुक्त टीमला उत्कृष्ट सादरीकरण आणि उत्कृष्ट मेकअप यासाठी विविध पारितोषिक जाहीर करण्यात आले होती. सदर स्पर्धेत सांगोल्याच्या कु. सायली कांबळे हिने सहभाग घेतला होता व सौ नीलम बाबर यांनी तिची रंगभूषा व वेशभूषा केले होती. सदर स्पर्धेत कुमारी सायली हिने उत्कृष्ट सादरीकरण करून प्रथम क्रमांकाचे सौंदर्यवती पारितोषिक रुपये ११००० व सन्मान चिन्ह प्राप्त केले. त्यांच्या यशाबद्दल आमदार श्री सुरेश खाडे व गवळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन गवळी यांचे हस्ते सन्मान करण्यात आला व पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

कु. सायली ही मिशन हॉस्पिटल मिरज येथे वैद्यकीय शिक्षण घेत असून सांगोला महाविद्यालयाचे प्रा. डॉ. विधीन कांबळे यांची ती कन्या आहे. तर सौ. नीलम बाबर या व्यावसायिक ब्युटीशियन असून त्यांचा या क्षेत्रात नाव लौकिक संपूर्ण सांगोला शहरात आहे. कुमारी सायली आणि सौ. नीलम बाबर यांचे या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे व अभिनंदन केले जात आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here