सांगोला (प्रतिनिधी):सांगोला आगारातून सांगोला ते दापोली थेट बस सेवा सुरू कराव्यात अशी मागणी शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने सोलापूर विभागाचे विभागीय वाहतूक नियंत्रक अमोल गोंजारी,सांगोला आगार प्रमुख विकास पोफळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या निवेदनात सांगोला ते स्वारगेट बस सेवा पहाटे हंगामी न चालवता ती नियमितपणे 4.30 वा सुरू ठेवावी, व दुपारी सांगोला– कराड–सांगोला या बस सेवेची अनेक प्रवाशांची मागणी होत आहे. सांगोला परिसरातील अनेक नागरिक दापोली या ठिकाणी सेवा, व्यवसाय,शिक्षणाकरिता पाटण, कोयनानगर, चिपळूण, खेड,दापोली या विविध भागामध्ये कार्यरत आहेत, तसेच या भागात पर्यटन ठिकाणे ,कृषी विद्यापीठ, असल्याने अनेक विद्यार्थी या भागात शिक्षण घेत आहेत त्यामुळे तालुक्यातील विद्यार्थी,नागरिकांना वेगवेगळ्या बस बदलून गैरसोईने प्रवास करावा लागत आहे, सोईस्कर व थेट बस सेवा सांगोला तालुक्यातील प्रवाशांकरिता दररोज सांगोला येथून सकाळी 8 वाजता सांगोला ते दापोली एसटी बस सेवा आटपाडी, खानापूर, विटा, कराड, पाटण, कोयनानगर,चिपळूण मार्गे सुरू करावी व सकाळी परतीच्या प्रवासाकरिता दापोली येथून देखील 7.00 वाजता सांगोला बस सुरु करावी, तसेच पुणे येथे जाण्याकरता हंगामी पहाटे 4.30 वाजता बस सेवा कायमस्वरूपी सुरू करावी व सांगोला –कराड बस दररोज दुपारी 2 वाजता, व परतीच्या प्रवासाकरता कराड येथून सकाळी सहा वाजता सुरू करावी अशी मागणी शहीद अशोक कामटे संघटना यांच्यावतीने करण्यात आली आहे. यावेळी आगार प्रमुख विकास पोकळे यांनी सदर या आवश्यक निवेदनाची मागणी लक्षात घेता वरिष्ठ कार्यालयाकडे तसा प्रस्ताव मंजुरी करिता पाठवणार आहे व सांगोलाआगारस नवीन बस मिळणेकामी कामटे संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करावेत असे सांगितले.

या निवेदनाच्या प्रती प्रताप सरनाईक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मुंबई, राज्य व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मुंबई,
यांनाही देण्यात आले आहेत.यावेळी भाजपाचे किसान सेलचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव गायकवाड, मकरंद पाटील, सचिन घाडगे, प्रा प्रसाद खडतरे सह अशोक कामटे संघटनेचे सदस्य,पदाधिकारी उपस्थित होते.
1)सध्या सोलापूर विभागात बसेसची कमतरता आहे वरिष्ठ कार्यालयाकडे या समस्या प्रश्न मागणी केली आहे नवीन बस प्राप्त होताच अशोक कामटे संघटनेने मागणी केल्याप्रमाणे सांगोला आगारातून नवीन फेऱ्या सुरू करण्यात येणार आहे त्यामुळे सांगोला दापोली या मार्गावर विविध गावांकडे जाण्याकरिता प्रवाशांची सोय होणार आहे.
अमोल गोंजारी
विभागीय वाहतूक नियंत्रक सोलापूर विभाग महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ.
2) सांगोला आगारातून दापोली येथे जाण्याकरता दररोज सकाळी पंढरपूर येथून सकाळी 7 वाजता सांगोला– नाझरे– आटपाडी मार्गे, कराड ,पुणे(स्वारगेट)येथे पहाटे 4.30 ची बस सुरू करण्याकरिता अनेक प्रवाशांनी मागणी होती, त्यानुसार महामंडळाच्या वरिष्ठ कार्यालयास संघटनेचा पाठपुरावा सुरू आहे . याबाबत एसटी प्रशासन लवकरच सकारात्मक निर्णय घेईल असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निवेदन देतेवेळी सांगितले
निलकंठ शिंदे सर, अध्यक्ष अशोक कामटे संघटना, सांगोला.
3)सांगोला आगारातून दापोली, स्वारगेट बस सेवा सुरू करण्याकरिता विभागीय नियंत्रक यांच्याकडे अशोक कामटे संघटनेने मागणी केल्याप्रमाणे वरिष्ठ कार्यालयाकडे सकारात्मक प्रस्ताव पाठवणार आहे, व आगरास नवीन बसेसची कमतरता आहे त्याचा पाठपुरावा कामटे संघटनेने करावा.
विकास पोफळे, आगार प्रमुख, सांगोला.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



