केंद्रप्रमुख पदोन्नती संदर्भात आदर्श शिक्षक समितीने घेतली पालकमंत्र्यांची भेट

0

सांगोला (प्रतिनिधी): सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र शासनाचे ग्रामविकास मंत्री नामदार माननीय श्री जयकुमार गोरे साहेब यांना सोलापूर जिल्ह्यातील केंद्रप्रमुख पदोन्नती संदर्भाने महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती कडून निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.

आज आदर्श शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र शासनाचे ग्रामविकास मंत्री सन्माननीय नामदार श्री जयकुमार गोरे साहेब यांना १० जून २०१४ च्या केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी च्या अधिसूचनेनुसार* *सोलापूर जिल्ह्यामधून पाच ते सहा याचिका न्यायालयात प्रलंबित असल्याने व नव्याने 18 जुलै 2025 ची अधिसुचना येऊन सुद्धा सोलापूर जिल्ह्यामध्ये केंद्रप्रमुख पदोन्नती प्रक्रिया होत नाही. व जिल्हास्तरावर प्रशासन ही याचिका न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे 18 जुलै 2025 च्या केंद्रप्रमुख अधिसूचना अनुसार केंद्रप्रमुख पदोन्नती करण्यास प्रशासन नकार देत आहे. सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये पदोन्नतीने भरावायची* *केंद्रप्रमुखाचे पदे 50% कार्यरत आहेत. त्यामुळे कार्यरत केंद्रप्रमुखावर अतिरिक्त काम पडत आहे. यातून मार्ग काढण्यासंदर्भात साहेबांना विनंती करण्यात आली आहे. साहेबांनी सुद्धा योग्य असा सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरात लवकर हा विषय निकाली काढण्याचे आश्वासन दिले.* *तसेच एक सप्टेंबर 2025 च्या सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालात सर्व शिक्षकांना TET परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे या संदर्भाने सुद्धा चर्चा करून शासनाच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयामध्ये भक्कम बाजू मांडावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली.

तसेच इतर जिल्हा परिषदेप्रमाणे सोलापूर जिल्ह्यात सुद्धा विस्तार अधिकारी वर्ग – 3 श्रेणी 1व श्रेणी 2 ची रिक्त पदे हे लवकरात लवकर बघण्यासंदर्भात आपल्या स्तरावरून जिल्हा प्रशासनाला सूचना करण्याची संघटने कडून विनंती करण्यात आली.

यावेळी आदर्श शिक्षक समितीचे मार्गदर्शक श्री.भिवाजी कांबळे सर, श्री अंकुशजी काळे सर,जिल्हाध्यक्ष संजीव चाफाकरंडे सर, जिल्हा संचालक रमेश घंटेनवरू सर, पदवीधर संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री गिरीश जाधव ,आदर्श शिक्षक समितीचे नेते श्री संजय काळे सर, अभिजीत ननवरे, अनिल खडाखडे, ज्ञानदेव कोळेकर, सुखदेव लवटे इ.उपस्थित होते.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here