सांगोला (प्रतिनिधी): जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गोडसेवाडी (कमलापूर) येथील माजी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ दिनांक १७ नोव्हेंबर २०२५, वार -सोमवार रोजी दुपारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन माऊली पतसंस्थेचे चेअरमन श्री साधू गोडसे साहेब तसेच निवृत्त प्राध्यापक श्री श्रीरंग गोडसे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये कु. मनीषा भगवान गोडसे (राजपत्रित अधिकारी) महाराष्ट्र लोकसेवा आयोग, श्री किरण सदाशिव गोडसे वरिष्ठ तंत्रज्ञ एम एस ई बी पंढरपूर, श्री संदीप नामदेव गोडसे एमडीएस डेंटल स्पेशलिस्ट डॉक्टर, कु. सानिका दिलीप गोडसे बी पी एम कडलास, श्री आबासाहेब जालिंदर गोडसे एम ई गोल्ड मेडलिस्ट, श्री अविनाश रामचंद्र गोडसे इलेक्ट्रिक असिस्टंट टेक्निशियन एम एस सी बी, कु. वैष्णवी जगन्नाथ गोडसे बी पी एम कटफळ, कु.संस्कृती सुखदेव गोडसे बी पी एम मळोली, या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

तसेच श्री अतुल भीमराव गोडसे कनिष्ठ अभियंता एमएसईबी सोलापूर, श्री आकाश जगन्नाथ गोडसे नगररचना अधिकारी नगर परिषद सांगोला, श्री नितीन रामचंद्र देवळे पीएसआय मुंबई, श्री मयूर मुरलीधर गोडसे ग्राम महसूल अधिकारी, श्री महेश चंद्रकांत गोडसे महाराष्ट्र पोलीस, श्री सिताराम मारुती राऊत माध्यमिक शिक्षक विद्यामंदिर सांगोला, श्री सुमित साधू गोडसे एमबीबीएस, श्री स्वप्निल गणपत गोडसे बी एम एस एम डी, कु.ऋतुजा रमेश भाकरे बी ए एम एस, श्री सचिन मोहन गोडसे डेंटल असिस्टंट,श्री विशाल मारुती गोडसे इलेक्ट्रिक असिस्टंट टेक्निशियन, श्री अजय भारत गोडसे बी ए एम एस, स्वराज अंकुश गोडसे एलएलबी या विद्यार्थ्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती लक्ष्मीबाई कारंडे मॅडम व श्री दिगंबर पाटील सर तसेच पालक श्री विपुल मारुती गोडसे व इतर पालकांच्या सहकार्याने वरील कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नवनाथ गोडसे सर यांनी केले आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री पाटील सर यांनी मांडले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक


