पोलीस उपायुक्त अनिल घेरडीकर यांच्या उपस्थितीत किल्ला स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ पार पडला.
प्रतिनिधी?शशिकांत कोळी): शिवप्रेमी गणेश मंडळाच्या वतीने दिवाळी निमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ही किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण समारंभासाठी पोलीस उपायुक्त अनिल घेरडीकर साहेब यांना आमंत्रित करण्यात आले होते त्यांच्या उपस्थितीमध्ये बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला.

शिवप्रेमी मंडळच्या वतीने दि. 22ऑक्टोबर 2025रोजी परीक्षण समिती कडून किल्ला पाहणी केली. दि 24 ऑक्टोबर 2025 बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये प्रथम क्रमांक पारितोषिक हर्ष कमलाकर बुरुंगले.याने पटकावाले. द्वितीय क्रमांक आर्या देवानंद माने घेणे पटकावले तृतीय क्रमांक विश्वनाथ शिवलिंग स्वामी याने पटकावले चतुर्थ क्रमांक बसवराज सुतार याने पटकावले पाचवा क्रमांक विघ्नेश सुनील कुंभार याने पटकावले . या सर्व यशवी स्पर्धकांचे मंडळाच्या वतीने व गावकऱ्यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले त्याचबरोबर सहभाग घेतलेल्या सर्व स्पर्धाकांचेही अभिनंदन करण्यात आले.

या बक्षीस वितरण प्रसंगी पोलीस उपयुक्त अनिल घेरडीकर, ग्रामपंचायत सदस्य श्रीनिवास करे युवक नेते परमेश्वर गेजगे युवा उदयोजक धर्मेंद्र कांबळे बुरुंगले सर सचिन पोळ गुरुजी दत्ता खुळपे गुरुजी श्री क्षीरसागर अक्षय पोळ विलास मोटे, शिवप्रेमी मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक


